Pune : सहाशे विद्यार्थ्यांनी घातले मनोहारी सूर्यनमस्कार; जिल्हास्तरीय सूर्यनमस्कार स्पर्धा

एमपीसी न्यूज – सकाळच्या प्रसन्न वातावरणात सहाशे विद्यार्थ्यांनी एकत्रितपणे (Pune)मनोहारी सूर्यनमस्कार घालत शारीरिक लवचिकतेचे दर्शन घडवले.

परमपूज्य सद्गुरू श्री गंगाधर स्वामी महाराज पुण्यतिथीनिमित्त श्री देशमुख महाराज फाऊंडेशन आणि डी. एम. फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित सप्ताहामधील जिल्हास्तरीय भव्य सूर्यनमस्कार स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सारसबागेत आयोजिलेल्या सूर्यनमस्कार स्पर्धेत पुण्यातील 40 पेक्षा अधिक शाळांतून सहाशे विद्यार्थी सहभागी झाले. आंतरराष्ट्रीय पॉवरलिफ्टर अरुण दातार, श्याम सहानी, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, योगेश समेळ, विजय महाराज देशमुख, कुमारी सुवर्णा बालेघाटे, नरहर शिदोरे, संजय देशमुख,धनश्री लोणकर आदी उपस्थित होते.

देशमुख महाराज म्हणाले, “विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व शारीरिक विकासाला (Pune)चालना मिळावी, या उद्देशाने दरवर्षी सप्ताहामध्ये निबंध स्पर्धा व सूर्यनमस्कार स्पर्धा घेतली जाते. निबंध स्पर्धेत यंदा 350, तर सूर्यनमस्कार स्पर्धेत 600 विद्यार्थी सहभागी झाले. पुणे महापालिकेच्या शाळांसह इतर शाळांतील विद्यार्थ्यांचा या स्पर्धेत सहभाग वाढावा, यासाठी प्रयत्नशील आहोत.”

Shirgaon : गावठी दारू निर्मिती प्रकरणी महिलेवर गुन्हा, 4 लाख रुपयांचे रसायन जप्त

अरुण दातार म्हणाले, “सूर्यनमस्कार शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहण्यासाठी लाभदायी आहेत. सूर्योदयाच्यावेळी सूर्यनमस्कार केल्याने दिवसाची सुरुवात सकारात्मक होते. मनाची एकाग्रता वाढते. सूर्यनमस्काराने संपूर्ण शरीरातील प्रत्येक अवयवाचा व्यायाम होतोच; शिवाय रक्ताभिसरण, पचन प्रक्रियाही सुधारते. ‘सूर्यनमस्कार ऊर्जादायी, ध्यानदायी आणि आरामदायी असतात.”

श्याम सहानी व हेमंत रासने यांनी फाऊंडेशनच्या सातत्यपूर्ण कार्याचा गौरव करत व्यायाम, आहार, चांगले आदर्श आपल्या आयुष्याला सक्षम बनवतात, असे सांगितले. कुमारी सुवर्णा बालेघाटे यांनी स्पर्धेचे संयोजन केले. सोनल घनवट यांनी सूत्रसंचालन केले.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.