Pune : एक्सलन्सी अकादमीवर मात करीत एस आर पी एफ ची उपांत्यपूर्व फेरीत धडक

एमजे चषक तिसरी निमंत्रित हॉकी स्पर्धा 2023

एमपीसी न्यूज –  राज्य राखीव पोलीस दल (SRPF) पुणे संघाने यजमान ( Pune)  एक्सलन्सी हॉकी अकादमीला पराभूत करीत एमजे चषक तिसरी निमंत्रित हॉकी स्पर्धेत उपांत्य पूर्व फेरीकडे वाटचाल केली. ही स्पर्धा नेहरूनगर-पिंपरी येथील मेजर ध्यानचंद स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आली आहे.
यजमान एक्सलन्सी हॉकी अकादमीला 1-0  गोलने पराभूत करण्यापूर्वी एस आर पी एफ संघाला कठोर परिश्रम करावे लागले. सामन्यातील महत्त्वाचा गोल किशोर पाटील (44 वे) याने पेनल्टी कॉर्नरवर नोंदविला. उपांत्यपूर्व फेरीत जीएसटी कस्टम्स, पुणे,  हॉकी लव्हर्स क्लब, मध्य रेल्वे क्लब पुणे, क्रीडा प्रबोधिनी आणि पीसीएमसी यांनी यापूर्वीच आपला प्रवेश निश्चित केला आहे.धनराज पिल्ले फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने हॉकी महाराष्ट्रच्या नेतृत्वाखाली आणि एक्सलन्सी हॉकी अकादमीने ही स्पर्धा आयोजित केली आहे.

इन्कम टॅक्स पुणे इलेव्हनने पात्र होण्याच्या संधी कायम ठेवताना रेल्वे लाइन बॉईजला 3-1  असे पराभूत केले. विक्रम सिंग (25 वे) आणि मोहम्मद शाकीर (37 वे) यांनी पेनल्टी कॉर्नरवर गोल केले तर 29 व्या मिनिटाला एम. दानिश याने मैदानी गोल  केला.मुंबई रिपब्लिकन आणि किड्स इलेव्हन यांच्यातील मुंबई संघाने 10-1 असा  मोठ्या फरकाने जिंकला आणि साखळी गटात पहिला विजय नोंदवला.
निकाल 
एसआरपीएफ पुणे: 1 (किशोर पाटील 44 वे ) वि.वि.एक्सलन्सी हॉकी अकादमी: 0
इन्कम टॅक्स इलेव्हन पुणे: 3  (विक्रम सिंग 25  वे, एम.दानिश 29 वे ; मोहम्मद शाकीर  37वे ) वि.वि. रेल्वे लाइन बॉईज 1  (कृणाल गोही 56 वे )
मुंबई रिपब्लिकन: 10 (व्यंकटेश देवकर दुसरे, 36 वे, 48 वे, 60 वे; हर्ष यादव 7 वे, 58 वे; विजय पिल्ले 28 वे, 60 वे; करण सिंग38 वे; लक्ष्मीकांत कावळे 49 वे) वि.वि किड्स 1  (साहिल हिरे 22 वे )

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.