_MPC_DIR_MPU_III

Pune : परराज्यात व जिल्हयांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थी, मजुरांनी घाबरु नये – डॉ. दीपक म्हैसेकर

एमपीसी न्यूज – पुणे विभागातून इतर राज्यांत किंवा इतर जिल्हयांमध्ये जाणाऱ्या नागरिकांनी, विद्यार्थ्यांनी व मजूरांनी इच्छितस्थळी जाण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आणि अर्ज करावा. त्यानंतर संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडून संमती मिळाल्यानंतर त्यांना पासेस दिली जातील. त्यामुळे विनाकारण गर्दी करू नये तसेच घाबरुन जावू नये, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी केले आहे.

_MPC_DIR_MPU_IV

पुणे विभागात अडकलेल्यांना ज्या भागात जावयाचे आहे त्यांना त्यांच्या भागाची स्वीकृती देणे अपेक्षीत आहे. जी व्यक्ती किंवा ग्रुप जावू इच्छितो त्यांनी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज करावेत. तसेच खाजगी किंवा शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र सादर करावे. या प्रमाणपत्रासाठी शासकीय रुग्णालयांच्या समोर अनावश्यक गर्दी टाळावी. सोशल डिस्टनसिंगचे पालन करावे. हे वैद्यकीय प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच अर्ज पाठवावा.

_MPC_DIR_MPU_II

अर्ज पाठविल्यानंतर तो अर्ज संबंधीत जिल्हाधिकारी यांच्याकडे जाईल. त्यांची संमत्ती मिळाल्यावरच जाण्यास परवानगी दिली जाईल. अशी परवानगी देताना त्यांनी स्वत: जाण्याची व्यवस्था करणे अपेक्षीत आहे. काही ठिकाणी राज्य शासन व केंद्र शासन जसा निर्णय घेईल त्याप्रमाणे रेल्वेची व्यवस्था केली जावू शकते. परंतु त्याबाबत केसनिहाय निर्णय होईल्. त्यामुळे अनावश्यक गर्दी टाळावी.

आजपर्यंत आपण सोशल डिस्नसिंग व लॉकडाऊनमुळे जे काही प्राप्त केलय त्याचे विनाकारण नुकसान होईल, असे कुठलीही कृती करु नये, असेही विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.