Pune : वळणे येथे 11 फुट अजगराने वानराला गिळले!; सर्पमित्र, स्‍थानिक, वनखात्‍याकडून अजगराला सोडले निसर्गाच्‍या सानिध्‍यात

एमपीसी न्यूज -मुळशी धरण भागातील वळणे (ता.मुळशी) येथे सुमारे अकरा फुट लांब अजगराने वानराला गिळल्‍याची घटना मंगळवार ही घटना घडली. वळणेवाडी येथे मानवी वस्‍तीजवळ घडलेल्‍या या प्रकारामुळे ग्रामस्‍थांमध्‍ये घबराट निर्माण झाली होती.

सर्पमित्र, स्‍थानिक ग्रामस्‍थ, वनखात्‍याचे कर्मचारी यांनी अजगराला पकडून निसर्गाच्‍या सानिध्‍यात सोडले. वळणेवाडी येथे ग्रामपंचायतीच्‍या पाण्‍याच्‍या लाईनजवळ गुरे चारणा-या कातकरी ग्रामस्‍थांना फुत्‍काराचे आवाज येत होते. अजगराने भक्ष गिळले होते. त्‍यामुळे त्‍याचे पोट फुगले होते.

अजगराने पोटातील भक्ष पोटातून बाहेर टाकण्‍यास सुरवात केली. काही वेळात अजगराने पोटातून एका मोठया वानराला बाहेर टाकले. अखेर रासनकर व योगेश भावेकर यांनी अजगराला पकडून पोत्‍यात टाकले. नंतर वनखात्‍याच्‍या ताब्‍यात देण्‍यात आले. अकरा फुट लांबीची ही मादी अजगर 13 ते 14 वर्षाची, 35 किलो वजनाची आणि पूर्ण वाढ झालेली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.