Pune : येरवडा कारागृहातून पळून गेलेला ‘तो’ कैदी अखेर जेरबंद

The 'he' prisoner who escaped from Yerawada jail was finally arrested : कोणीही आपल्याला ओळखू नये यासाठी देवगन याने  दाढी -मिशा काढून  टक्कल  केले होते. अखेर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

एमपीसीन्यूज : खून,दरोडा आणि मोक्कासह गंभीर गुन्हे नोंद असलेले पाच कैदी 16 जुलै रोजी येरवडा कारागृह फोडून पळून गेले होते. यातील दोघांना यापूर्वी अटक केली होती. त्यानंतर यातील तिसऱ्या कैद्यालाही  पुणे  ग्रामीण पोलिसांनी फिल्मी स्टाइल पाठलाग करून  जेरबंद केले.

देवगन अजिनाथ चव्हाण (वय -25) असे या कैद्याचे आरोपीचे नाव आहे. अहमदनगर जिल्ह्यातील एका गावातून त्याला अटक करण्यात आली.

16 जुलै रोजी पहाटे चारच्या सुमारास येरवडा कारागृहातील खिड़कीचे गज उचकटून तोडून टाकून खुनासह दरोडा मोक्का गुन्हयातील 3, खंडणी मोक्का गुन्हयातील 1  व घरफोडी गुन्हयातील 1  असे एकूण 5 कैदी पळून गेले होते. त्यातील दोघांना पोलिसांनी नंतर अटकही केली.

_MPC_DIR_MPU_II

परंतु खुनासह दरोडा, जबरी चोरी असे गंभीर स्वरूपाचे 9 गुन्हे दाखल असलेला देवगन चव्हाण फरार होता. तो श्रीगोंदा तालुक्यातील एका गावात लपला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

त्यानुसार पोलिस वेषांतर करून त्याला पकडण्यासाठी गेले असता तो पळून जाऊ लागला. यावेळी पोलिसांनी पाच किलोमीटर अंतर पाठलाग करत अखेरीस त्याला बेड्या ठोकल्या.

कोणीही आपल्याला ओळखू नये यासाठी देवगन याने  दाढी -मिशा काढून  टक्कल  केले होते. अखेर पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

ही कामगिरी स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक दत्तात्रय गुंड, हवालदार महेश गायकवाड, निलेश कदम, सचिन गायकवाड, पोलीस नाईक गुरु गायकवाड, सुभाष राऊत व श्रीगोंदा पोलीस स्टेशनचे हवालदार अंकुश ढवळे यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1