Pune Division Corona Update : पुणे विभागात बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 62.93 टक्के; 1लाख13 हजार 716 रुग्णांपैकी 71 हजार 562 रुग्णांची कोरोनावर मात

पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 133 ने वाढ झाली आहे. ; The recovery rate in Pune division is 62.93 per cent; Out of 1 lakh 13 thousand 716 patients, 71 thousand 562 patients overcome corona

एमपीसी न्यूज – पुणे विभागातील 71 हजार 562 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 1 लाख 13 हजार 716 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 39 हजार 145 आहे. विभागात कोरोनाबाधीत एकुण 3 हजार 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.93 टक्के, तर मृत्यूचे प्रमाण 2.65 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

रविवारी (दि. 2) रात्री नऊ वाजेपर्यंत आलेल्या आकडेवारीनुसार, आजपर्यत विभागामध्ये एकुण 6 लाख 4 हजार 474 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 1 लाख 13 हजार 716 नमून्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

कालच्या बाधीत रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 4 हजार 133 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 3 हजार 17, सातारा जिल्ह्यात 145, सोलापूर जिल्ह्यात 185, सांगली जिल्ह्यात 179 तर कोल्हापूर जिल्ह्यात 607 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

पुणे जिल्हा – पुणे जिल्हयातील 90 हजार 393 बाधीत रुग्ण असून कोरोना बाधित 60 हजार 272 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत.

ॲक्टीव रुग्ण संख्या 28 हजार 37 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 18 हजार 13, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 5 हजार 864, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 912, कॅन्टोंन्मेंट 675, व  ग्रामीण क्षेत्रातील 2 हजार 573 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे  जिल्हयात कोरोनाबाधित एकूण 2 हजार 84 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 1 हजार 393, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 387, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 68, कॅन्टोंन्मेंट विभागातील 75, व ग्रामीण क्षेत्रातील 161 रुग्णांचा समावेश आहे. पुणे जिल्हयामध्ये बरे  होणा-या रुग्णांचे प्रमाण 66.68 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.31 टक्के इतके आहे.

सातारा जिल्हा – सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत 4 हजार 228 रुग्ण असून 2 हजार 128 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 964 आहे. कोरोनाबाधित एकूण 136 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा – सोलापूर जिल्हयातील 9 हजार 46 कोरोना बाधीत रुग्ण असून 5 हजार 215 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 320 आहे. कोरोना बाधित एकूण 511 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा – सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत 2 हजार 905 रुग्ण असून 880 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 938 आहे. कोरोना बाधित एकूण 87 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्हा – जिल्हयातील 7 हजार 144 कोरोना बाधीत रुग्ण असून 3 हजार 67 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 886 आहे. कोरोना बाधित एकूण 191 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.