Maval Corona Update : मावळात सोमवारी कोरोनाचे 21 नवीन रुग्ण; एकूण कोरोनाबधित 829

दिवसभरात 44 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. : 21 new corona patients on Monday in Mawla; Total coronated 829

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात आज (सोमवारी, दि. 3) कोरोनाचे 21 नवीन रुग्ण सापडले. त्यामुळे कोरोनाबधितांची एकूण संख्या 829 झाली. तर दिवसभरात 44 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

आज आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये 10 रुग्ण शहरी भागातील आहेत. तर 11 रुग्ण ग्रामीण भागातील आहेत. ग्रामीण भागात आढळलेल्या रुग्णांमध्ये देवघर येथील दोन, परंदवडी, कुसगाव बु., वराळे, कान्हे, ब्राह्मणवाडी साते,  साळूम्बरे, काले येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे.

तळेगाव शहरात 9 आणि लोणावळा शहरात एक रुग्णाची नोंद झाली आहे. तर वडगाव शहरात आज एकाही रुग्णाची नोंद झाली नाही.

एकूण 808 रुग्णांमध्ये सध्या 388 रुग्ण सक्रीय आहेत. तर 414 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 27 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

तळेगाव नगरपरिषद क्षेत्रात 269, लोणावळा नगरपरिषद 66 आणि वडगाव नगरपंचायत क्षेत्रात 50 रुग्ण सापडले आहेत. तर ग्रामीण भागात 444 रुग्ण आढळून आले आहेत.

सध्या रुग्णालयात 207 आणि होम आयसोलेशनमध्ये 181 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.