Pune : दोन दिवसात एकही मृत्यू नाही; आज 80 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

एमपीसी न्यूज – पुणे शहरात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. रेडझोन मध्ये असलेल्या हा पुणेकरांसाठी मोठा दिलासा म्हणावा लागेल. असे असले तरी कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढतच आहे. आज ( सोमवारी) तब्बल 80 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. त्यामुळे आतापर्यंतच्या कोरोना रुग्णांची संख्या 734 झाली आहे.

पुणे शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, आज एकूण 13 रुग्ण कोरोनमुक्त झाले, ही पुणेकरांसाठी दिलासादायक बाब आहे. ससून रुग्णालयात मागील 48 तासांत एकही मृत्यू झाला नाही. त्यामुळे पुण्याचा वाढता मृत्यू दर काही प्रमाणात आटोक्यात आला आहे. या रुग्णालयात गेल्या 15 दिवसांत दररोज कोरोनाबाधितांचे मृत्यू होत होते. त्यामुळे ससूनचे डीन डॉ. अजय चंदनवाले यांची बदली करण्यात आली होती.

सध्या पुणे शहरात कडकडीत लॉकडाऊन पाळण्यात येत आहे. तरीही काही नागरिकांना त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.
भाजी बाजारात होणारी गर्दी, मॉर्निंग वरकलाही पुणेकरांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. वारंवार सांगूनही पुण्यातील गर्दी काही कमी होत नाही. पुणे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी संपूर्ण पुणे शहर सील करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी याची कडक अंमलबजावणी सुरू केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.