Pune : उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांच्या दंडात होणार वाढ, आता भरावा लागणार 500 रुपये दंड

एमपीसी न्यूज – पुणे महापालिकेने उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांच्या दंडामध्ये (Pune) वाढ केली आहे. पूर्वी उघड्यावर कचरा टाकून शहर घाण करणाऱ्यांवर पूर्वी फक्त 180 रुपयांचा दंड ठोठावला जात होता. मात्र, आता ही रक्कम वाढून थेट 500 रुपये करण्यात येणार आहे. हा प्रस्ताव महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्या समोर मान्यतेसाठी ठेवण्यात आला आहे.

Charholi :  डुडूळगाव येथील जागेत देशी वृक्ष लागवडीसाठी जागा हस्तांतरणाची वन विभागाला मागणी

शहरात गेल्या काही दिवसांपासून उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. प्रशासन सार्वजनिक ठिकाणी कचरा पडू नये यासाठी प्रयत्न करत आहे. ज्या ठिकाणी वारंवार कचरा टाकला जातो, तेथे कर्मचारी नियुक्त करून यावर प्रतिबंध आणण्याचा प्रयत्न केला जात आहे.

तरीही बेशिस्त नागरिकांच्या वागण्यात सुधारणा होत झालेली नाही. त्यामुळे नागरिकांवर धाक बसवा यासाठी आता दंडाची रक्कम वाढविण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. ही दंडाची रक्कम 500 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. हा प्रस्ताव महापालिका आयुक्तांच्या मान्यतेसाठी ठेवला (Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.