Pune : बड्या पोलीस अधिकाऱ्याच्या मुलगीने मद्यधुंद अवस्थेत सोसायटीत घातला धिंगाणा ; महिला पोलीस कर्मचाऱ्यांना केली मारहाण

एमपीसी न्यूज –  पुण्यात 31 डिसेंबरच्या रात्री एका तरुणीने मद्यधुंद ( Pune) अवस्थेत धिंगाणा घातला आहे. या घटनेचा व्हिडीओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.

Pune : उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांच्या दंडात होणार वाढ, आता भरावा लागणार 500 रुपये दंड

मिळालेल्या अधिक माहितीनुसार , एका मद्यधुंद तरुणीनं चांगलाच राडा घातला. वानवडीतील ऑक्सफर्ड कंफोर्ट सोसायटीत 31 डिसेंबरच्या रात्री ही घटना घडली. नशेच्या अमलाखाली असलेल्या तरुणीनं सोसायटीचं गेट बंद करून नागरिकांना उपद्रव केला. सोसायटीतील रहिवाशांनी पोलिसांना बोलावल्यानंतर तिनं महिला पोलीस कर्मचाऱ्यांना देखील मारहाण केली.
तसंच सोसायटीच्या मालमत्तेची तोडफोड केली, असं रहिवाशांचं म्हणणं आहे. अखेर पोलिसांनी बळाचा वापर करत तिला ताब्यात घेतलं. संबंधित तरुणी एका बड्या पोलीस अधिकाऱ्याची मुलगी असल्यानं तिला लगेच सोडून देण्यात आलं, असं सोसायटीतील रहिवाशांचं ( Pune) म्हणणं आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.