Talegaon Dabhade : वडगाव फाटा चौकात उभारणार छत्रपती संभाजी महाराजांचा भव्य पुतळा

एमपीसी न्यूज – आगामी काळात वडगाव फाट्यावरून तळेगावमध्ये ( Talegaon Dabhade) प्रवेश करताना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्याचा  मानस माजी मंत्री बाळा भेगडे यांनी व्यक्त केला. तसेच या चौकाचे नाव धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौक कायम होण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.
सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठान कडून वडगाव फाट्यावरील चौकास धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज असे नामकरण असलेल्या फलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी माजी मंत्री बाळा भेगडे, आमदार सुनील शेळके, माजी नगराध्यक्षा श्रीमंत अंजलीराजे दाभाडे, माजी उपनगराध्यक्ष सत्येंद्रराजे दाभाडे, मावळ तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष गणेश खांडगे, वरिष्ठ उपाध्यक्ष गणेश काकडे, भाजपाचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय गुंड, प्रभारी भास्करराव म्हाळसकर, सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष दाभाडे पाटील,

अध्यक्ष सुबोध दाभाडे, ॲड.रविंद्र दाभाडे,वडगावचे नगराध्यक्ष मयूर ढोरे,मा सभापती गुलाब म्हाळसकर मा. उपसभापती शांताराम कदम, तळेगाव शहर भाजप अध्यक्ष अशोक दाभाडे, सरसेनापती उमाबाई दाभाडे नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष सुनील दाभाडे, मा.अध्यक्ष अण्णासाहेब दाभाडे,विलास काळोखे, माजी नगरसेविका शोभा भेगडे,रजनी ठाकूर,मुन्ना मोरे आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि राज्य शासनाकडे पत्रव्यवहार करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज चौकाचे नाव कायम होण्यासाठी पाठपुरावा करणार आहोत. तसेच सरसेनापती उमाबाई दाभाडे प्रतिष्ठानच्या माध्यमातून सदर चौकाच्या सुशोभिकरणासाठी मदत करण्याची ग्वाही आमदार सुनील शेळके यांनी यावेळी बोलताना दिली.
प्रतिष्ठानचे संस्थापक संतोष दाभाडे,अध्यक्ष सुबोध दाभाडे, कार्याध्यक्ष सुनील दाभाडे,निलेश दाभाडे,दिपक दाभाडे आणि सहका-यांनी नियोजनासाठी परिश्रम घेतले. ॲड विनय दाभाडे यांनी सूत्रसंचालन ( Talegaon Dabhade) केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.