Pune: दारूचे दुकान फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह दारूच्या बाटल्या चोरून नेल्या

Pune: Thieves broke into a liquor store and stole bottles of liquor along with cash चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाच्या दरवाजाची काच फोडली आणि दरवाजा उघडून आत प्रवेश केला.

एमपीसी न्यूज- पुणे शहरात मागील काही दिवसात चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसून येत आहे. चोरट्यांनी यापूर्वी बंद घरांना लक्ष केले होते. परंतु, आता बंद दुकाने चोरट्यांच्या रडारवर आले आहेत. पुण्यातील चंदन नगर परिसरातील दारू विक्रीचे दुकान फोडून चोरट्यांनी रोख रक्कम आणि दारूच्या बाटल्या चोरून नेल्या.

याप्रकरणी समीर जैस्वाल (वय 30) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्या विरोधात चंदननगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खराडी येथील जुना मुंढवा रस्त्यावर जैस्वाल यांचे दारू विक्रीचे दुकान आहे. चोरट्यांनी मध्यरात्री दुकानाच्या दरवाजाची काच फोडली आणि दरवाजा उघडून आत प्रवेश केला. त्यानंतर चोरट्यांनी दुकानातील दारूच्या बाटल्या आणि रोख रक्कम आता दोन लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

दुसऱ्या दिवशी सकाळी फिर्यादी दुकानात आल्यानंतर चोरी झाल्याचा प्रकार त्यांच्या लक्षात आला. त्यानंतर त्यांनी चंदननगर पोलिस स्टेशन गाठून तक्रार दिली. पोलिसांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून चोरट्यांचा तपास करण्यास सुरुवात केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.