Pune : पाषाण तलावाजवळ आढळली दोन जुळी जिवंत बाळे

एमपीसी न्यूज-  पुण्यात पाषाण तलावाजवळ दोन जिवंत जुळी बाळे आढळून आल्याचा प्रकार उघडकीस आला असून परिसरात खळबळ उडाली आहे.  पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पोलिसांचा तपास सुरु आहे. सकाळी फेरफटका मारण्यासाठी गेलेल्या काही नागरिकांना तलावाच्या काठावर गोधडीत बांधलेली दोन बाळे आढळून आली. या बाळांच्या रडण्यामुळे त्यांचे लक्ष गेले. त्यापैकी एक मुलगा व एक मुलगी आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.