Pune University : ही तर पुणे मनपातील भाजपाच्या भावी यशाची नांदी – संदीप खर्डेकर

एमपीसी न्यूज – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Pune University) सिनेटच्या निवडणुकीत 10 पैकी 9 जागा जिंकून विद्यापीठ विकास मंचने दणदणीत विजय मिळवला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी या निवडणुकीत आपले पॅनल उतरविले होते. अनेक ठिकाणी निवडणूक कार्यालयांचे उदघाट्न करून राष्ट्रवादीच्या नेत्यांनी विजयाच्या वल्गना केल्या होत्या.

विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीही निवडणुकीत जातीने लक्ष घातले होते. मात्र, त्यांच्या पॅनलचा दारुण पराभव हा पुणे मनपा निवडणुकीत भाजपाला मिळणाऱ्या यशाची नांदी आहे. महाविकास आघाडीने मतदारांचा कौल लक्षात घ्यावा, अशी प्रतिक्रिया भाजपाचे प्रवक्ते संदीप खर्डेकर यांनी दिली आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपा आणि बाळासाहेबांच्या शिवसेनेला मिळालेले यश, भीमा साखर कारखान्याच्या निवडणुकीत खा. धनंजय महाडिक यांनी मिळविलेले यश आणि आता पुणे विद्यापीठ सिनेटच्या निवडणुकीत मिळालेले यश हे आघाडीला महाराष्ट्राच्या जनतेने सपशेल नाकारल्याचे निदर्शक असून यातून बोध घेऊन राष्ट्रवादीच्या पुण्यातील नेत्यांनी अश्लाघ्य टीका करायचे थांबवावे, असे आवाहनही संदीप खर्डेकर यांनी केले आहे.

PMFBY : रब्बी हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेत सहभाग घेण्याचे आवाहन

सर्व विजयी उमेदवारांचे अभिनंदन (Pune University) करताना येणाऱ्या काळात पुणे विद्यापीठ अधिक प्रगती करेल व पारदर्शी कारभाराचा आदर्श निर्माण करेल असा विश्वासही खर्डेकर यांनी व्यक्त केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.