Pune : प्रवासासाठी बस आणि रेल्वेचा वापर करा; मेधा पाटकर यांचे कामगारांना आवाहन

Pune: Use buses and trains for travel; Medha Patkar's appeal to the workers

एमपीसी न्यूज – पुणे जिल्ह्यामध्ये असलेल्या कामगारांनी, स्थलांतरीत कामगारांनी गावी जाताना पायी न जाता उपलब्ध असलेल्या बस अथवा रेल्वेचा वापर करून आपल्या मूळगावी जावे, असे आवाहन नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केले.

पिंपरी चिंचवडसह पुणे शहरातील सर्व असंघटित कामगारांशी मेधाताई पाटकर यांनी  त्यांनी संवाद साधला. यावेळी कष्टकरी संघर्ष महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते, इब्राहिम खान, महिला विभागाच्या माधुरी जलमूलवार, उमेश डोर्ले, नाना कसबे, इरफान चौधरी, अर्चना कांबळे, सुमन अहिरे, तुकाराम माने आदीसह विविध ठिकाणचे कामगार उपस्थित होते.

परराज्यातील कामगार व मजूर आपल्या मूळ गावी परतण्यासाठी मिळेल त्या वाहनाने अथवा पायी चालत असुरक्षित प्रवास करत आहेत. अशा असुरक्षित प्रवास करून कामगार आपला जीव धोक्यात घालत आहेत. तसेच असुरक्षित प्रवास केल्यामुळे त्यांच्या आरोग्याला सुद्धा धोका निर्माण होत आहे. त्यामुळे, स्थलांतरीत कामगारांनी गावी जाताना पायी न जाता उपलब्ध असलेल्या बस अथवा रेल्वेचा वापर करून आपल्या मूळगावी जावे, असे आवाहन नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.