Pune : अग्रवाल समाज फेडरेशन युवा समिती अध्यक्षपदी विकास गर्ग यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – अग्रवाल समाज फेडरेशन युवा समिती अध्यक्षपदी ( Pune)  विकास गर्ग यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  फेडरेशनचे अध्यक्ष कृष्ण कुमार गोयल यांनी त्यांना  नियुक्तीपत्र प्रदान केले . यावेळी अग्रवाल समाज फेडरेशनचे विनोद शिवनारायण बंसल, सेक्रेटरी सीए के एल बंसल, कोषाध्यक्ष श्याम पी गोयल आणि युवा समितीची चीफ ऑर्डिनेटर नीता चंद्रशेखर अग्रवाल, मीना गोयल, लक्ष्मी बंसल आदी उपस्थित होते.

वर्ष 2024 -25 साठी  युवा समितीत सचिवपदी  पंकज अग्रवाल, श्रेया कसेरा, कोषाध्यक्षपदी  सिमरन अग्रवाल , संयोजकपदीहितेश सुभाष अग्रवाल  यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  तर चीफ ऑर्डिनेटर पदी नीता चंद्रशेखर अग्रवाल  या असतील.

Nigdi :  प्राधिकरण येथे ज्येष्ठ नागरिकांनी घेतली मतदानाची शपथ

युवा कमिटीच्या नव्या कार्यकारिणीला फेडरेशनच्या कोर कमिटीचे सदस्य एमबी अग्रवाल, नंदलाल गुप्ता, नितिन अग्रवाल यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी अग्रवाल समाज फेडरेशनचे अध्यक्ष कृष्ण कुमार गोयल  म्हणाले , फेडरेशनने   पुणे जिल्ह्यातील अग्रवाल कुटुंबांना जोडण्यासाठी युवा समितीची रचना केली. या माध्यमातून युवा कल्याणासाठी आणि युवांसाठी वर्षभरात अनेक सामाजिक सांस्कृतिक आणि शैक्षणिक कार्यक्रम आयोजित केले ( Pune)   जातात.

 

 

https://www.youtube.com/shorts/60GFMGPGf88

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.