Pune : सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताहाचे आयोजन

एमपीसी न्यूज – भारतीय काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनीया गांधी (Pune) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 19 व्या सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताहाचे उद्घाटन उद्या शनिवारी दि. 2 डिसेंबर सायंकाळी 6 वाजता नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते होणार आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. हा सप्ताह 2 डिसेंबर ते 10 डिसेंबर 2023 या कालावधीत साजरा होत आहे, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष माजी आमदार मोहन जोशी यांनी दिली.

मोहन जोशी म्हणाले, “यंदाचा सप्ताह ‘जुडेगा भारत, जितेगा इंडिया’ या संकल्पनेच्या माध्यमातून साजरा होत आहे. ‘गांधी, नेहरू आणि आंबेडकर यांचा भारत’ या विषयावर सप्ताहात व्याख्यान आयोजित केले जाणार आहे.

सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताहाचा उद्घाटन सोहळा महाराष्ट्राच्या राजकारणात उत्सुकतेचा ठरलेला आहे. विविध विचारवंत, प्रमुख राजकीय नेते यांनी केलेली भाषणे राजकारणात गाजलेली असून, त्यावर प्रदीर्घ काळ चर्चा होत राहिली आहे. यंदाचा सोहळाही वैचारिकदृष्ट्या संस्मरणीय ठरेल, असा विश्वास वाटतो.”

Pune : शहनाज बेग यांना पहिला ‘सर्वोत्कृष्ट गाईड ‘पुरस्कार प्रदान

“आदरणीय सोनियाजी गांधी यांनी पंतप्रधान पदाचा त्याग केला. जनतेप्रती सेवाभाव ठेवून निष्ठेने कर्तव्य पार पाडत आहेत. (Pune) याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 2024 सालपासून काँग्रेसच्या वतीने सेवा, कर्तव्य आणि त्याग सप्ताह साजरा करत आहोत. या सप्ताहात ससूनमधील शवागारात काम करणाऱ्या कामगारांचा सत्कार, ‘मुठाई नदी काल, आज आणि उद्या’ या विषयावर खुला गट चित्रकला स्पर्धा, रक्तदान शिबिर, महाआरोग्य तपासणी शिबिर, अनाथ आश्रम, वृद्धाश्रम, अंध शाळा आदी ठिकाणी फळे, मिठाई, कपडे वाटप, तसेच पदपथावर राहणाऱ्यांना एक हजार ब्लँकेट वाटप, महिलांसाठी वेशभूषा स्पर्धा, विशेष आरोग्य शिबिर, सफाई महिला कर्मचारी सत्कार आणि साड्या व आरोग्य कीट वाटप आदी उपक्रम आयोजिले आहेत. संविधान घर तयार करून त्यात प्रदर्शन भरविले जाईल. प्रियदर्शनी इंदिरा विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात येणार आहे. शहराच्या विविध भागात हे उपक्रम राबविले जाणार आहेत,” असेही मोहन जोशी यांनी नमूद केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.