Pune : पुण्यात लोकसभा निवडणुकीत मनसेची उमेदवारी कोणाला?

एमपीसी न्यूज – आगामी पुणे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उमेदवारी (Pune) कोणाला मिळणार, याची उत्सुकता लागली आहे. उमेदवारी मिळविण्यासाठी मनसेचे पुणे शहराध्यक्ष साईनाथ बाबर आणि महापालिकेचे विरोधी पक्षनेते वसंत मोरे यांच्यात जबरदस्त स्पर्धा सुरू आहे. पक्षाध्यक्ष राज ठाकरे जो काही आदेश देतील तो आम्ही पाळणार असल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले. पुणे लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी आपण सुरू केल्याचेही ते म्हणाले.

देशभरात सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. पुण्यात देखील भाजपसह सर्वच पक्षांनी लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. पुण्यात भाजप आणि काँग्रेसच्या इच्छुकांनी मोर्चेबांधणीला सुरुवात केली असून आता या लढाईत मनसे देखील उतरली आहे. मनसेमधून कधीकाळच्या दोन जिगरी मित्रांमधेच लोकसभेच्या तिकिटासाठी जोरदार स्पर्धा पाहायला मिळत आहे.

Khed : ‘ती’ लिफ्ट तिच्यासाठी ठरली शेवटची! दुचाकी टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू

वसंत मोरे आणि साईनाथ बाबर या दोघांनीही पुणे लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी पक्ष नेतृत्वाकडे मागणी केली आहे. वसंत मोरे यांनी शहरभर बॅनरबाजी करत (Pune) आपणच मनसेचे लोकसभेचे उमेदवार असल्याचे ठामपणे सांगितले आहे.

आता दुसरीकडे मनसेचे साईनाथ बाबर यांनी देखील आपण लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक असल्याचे म्हटले आहे. यासंदर्भात आता पुढच्या आठवड्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वतः आढावा बैठक घेणार आहेत. त्यामुळे मनसेकडून या दोन जिगरी मित्रांपैकी कोणाला उमेदवारी मिळणार की राज ठाकरे तिसऱ्याच नावाला पसंती देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, मनसेचे परभारी अमित ठाकरे यांनी पुणे लोकसभा निवडणुकी संदर्भात आपला अहवाल राज ठाकरे यांच्याकडे सोपविला आहे. त्यावर काय निर्णय होणार, याकडे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.