Shirur : शिरूर लोकसभा मतदारसंघावरून अजित पवार आणि शिंदे गटात संघर्ष वाढणार?

एमपीसी न्यूज – शिरूर लोकसभा मतदारसंघात डॉ. अमोल कोल्हे पुन्हा निवडून (Shirur) येणार नाहीत, असे सांगत अजित पवार यांनी मतदारसंघावर दावा ठोकला आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आगामी काळात पवार गट आणि शिंदे गट शिरूर लोकसभा मतदारसंघावरून जोरदार संघर्ष होण्याची चिन्हे आहेत.

राष्ट्रवादीने गेल्या वेळी जिंकलेल्या सर्व जागा लढविण्याची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. शिरुरमध्ये शरद पवार गटाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे पुन्हा निवडून येणार नाहीत, अशी भविष्यवाणीही पवार यांनी वर्तविली आहे.

Pune : पुण्यात लोकसभा निवडणुकीत मनसेची उमेदवारी कोणाला?

या मतदारसंघात शिंदे गटाचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे इच्छूक आहेत. मुख्यमंत्री शिंदे यांचा शिरुर मतदारसंघात दौरा होणार असल्याने या (Shirur) मतदारसंघावर शिंदे व पवार गटात धुसफूस होण्याची चिन्हे आहेत.

दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. सध्या राज्यात शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) यांची सत्ता आहे. त्यामुळे आगामी काळात जागावाटप कसे होणार, याकडे लक्ष लागले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.