Bhosari : सराईत वाहन चोरट्यास अटक; पाच दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज – भोसरी पोलिसांनी एका सराईत वाहन चोरट्याला (Bhosari) अटक केली. त्याच्याकडून पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. वाहन चोरीच्या पाच गुन्ह्यांसह एकूण सात गुन्ह्यांची उकल झाली आहे.

वीरेंद्र कुमार मिस्त्रीलाल (वय 23, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी पोलीस ठाण्यातील तपास पथकाच्या पोलिसांनी भोसरी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून एका वाहन चोरी करणाऱ्या तरुणाची ओळख पटवली. त्याला धावडेवस्ती भोसरी येथून ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडून पाच दुचाकींसह तीन लाख 18 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

Shirur : शिरूर लोकसभा मतदारसंघावरून अजित पवार आणि शिंदे गटात संघर्ष वाढणार?

आरोपी वीरेंद्र हा फिरस्ता असून तो पूर्वी एका वाईन शॉपमध्ये काम करत होता. तिथेही त्याने दोन वेळा चोरी केल्याचे उघडकीस आले आहे. या कारवाईमुळे वाहन चोरीचे (Bhosari) पाच आणि घरफोडीचे दोन असे एकूण सात गुन्हे उघडकीस आले आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलीस सह आयुक्त डॉ. संजय शिंदे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, पोलीस उपायुक्त विवेक पाटील, सहायक आयुक्त विठ्ठल कुबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारे, सहायक निरीक्षक कल्याण घाडगे, उपनिरीक्षक मुकेश मोहारे, पोलीस अंमलदार हेमंत खरात, डी बी केंद्रे, मुळे, नवनाथ पोटे, प्रकाश भोजने, सचिन सातपुते, तुषार वराडे, स्वामी नरवडे, सागर जाधव, प्रभाकर खाडे, महादेव गारोळे, भाग्यश्री जमदाडे यांनी केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.