Khed : ‘ती’ लिफ्ट तिच्यासाठी ठरली शेवटची! दुचाकी टेम्पोच्या धडकेत महिलेचा मृत्यू

एमपीसी न्यूज – घरी जाण्यासाठी घेतलेली लिफ्ट एका तरुणीसाठी शेवटची (Khed) ठरली. निघोजे येथे दुचाकी व टेम्पो यांच्या धडकेत 33 वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला आहे. हा अपघात गुरुवारी (दि.28) पहाटे निघोजे, खेड येथे घडला.

याप्रकरणी राजेंद्र शंकर पवार (वय 40, रा. डोंगर वस्ती, खेड ) यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीवरून पोलिसांनी एम एच 04 जे. आर.8755 या आयशर टेम्पो चालकावर गुन्हा दाखल केला आहे. वर्षा संतोष बसवंते (वय 33, रा. निघोजे) असे मयत तरुणीचे नाव आहे.

Talegaon Dabhade : 2 जानेवारी ते 5 जानेवारी रोजी मावळभूषण कृष्णराव भेगडे यांची जाहीर व्याख्यानमाला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांची नाईट शिफ्ट संपून त्यांच्या दुचाकीवरून घरी जात होते. यावेळी रस्त्यामध्ये वर्षा यांनी फिर्यादी यांना हात दाखवून थांबवले. यावेळी फिर्यादी यांनी त्यांना लिफ्ट दिली. दोघे दुचाकीवरून डोंगरवस्ती कडे (Khed) निघाले. यावेळी दुचाकी वरून जात असताना पाठीमागून आयशर टेम्पोने पाठी मागून जोरात धडक दिली. यात फिर्यादी हे जखमी झाले तर वर्षा यांच्या डोक्याला मार लागून त्यांचा मृत्यू झाला. यावरून महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.