Talegaon Dabhade : 2 जानेवारी ते 5 जानेवारी रोजी मावळभूषण कृष्णराव भेगडे यांची जाहीर व्याख्यानमाला

एमपीसी न्यूज – इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने (Talegaon Dabhade) मावळभूषण कृष्णराव भेगडे जाहीर व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. ही व्याख्यानमाला मंगळवार (दि. 2) ते शुक्रवार (दि. 5) या कालावधीत होणार आहे. यामध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण,दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेद महाजन,ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस आणि ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर यांची व्याख्याने होणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे, सदस्या निरूपा कानिटकर,संजय साने,युवराज काकडे,प्राचार्य डॉ. संभाजी मलघे उपस्थित होते. व्याख्यानमालेचे हे नववे वर्ष आहे.
या व्याख्यानमालेचे उदघाटन(दि 2) जळगाव येथील दीपस्तंभ फाउंडेशनचे संस्थापक यजुर्वेद महाजन यांच्या व्याख्यानाने होणार आहे. ते ‘स्वप्ने बघा’ या विषयावर व्याख्यान देणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे हे असणार आहेत.

व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प(दि 3) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे गुंफणार आहेत. ते ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. तर अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे हे असणार आहेत.

Chakan : सिंगापूर येथे जॉबचे आमिष दाखवून 53 वर्षीय नागरिकाची फसवणूक

यावेळी संस्थेच्या इंद्रायणी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (बी फार्मसी) महाविद्यालयाचे नामकरण कृष्णराव भेगडे इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च (बी फार्मसी) असे करण्यात येणार आहे. हे नामकरण महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे हस्ते करण्यात येणार आहे.

तिसरे पुष्प (दि 4) अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे (Talegaon Dabhade ) अध्यक्ष डाॅ. श्रीपाल सबनिस हे गुंफणार असुन ते भारतीय संस्कृती आणि विश्वात्मकता या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत. यावेळी अध्यक्षस्थानी आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन इटकर हे असतील.

तर व्याख्यानमालेचे अखेरचे पुष्प(दि 5) ज्येष्ठ पत्रकार व संपादक उदय निरगुडकर हे गुफ॔णार आहेत. यावेळी अध्यक्षस्थानी त्रिदल संस्थेचे अध्यक्ष डॉ.सतीश देसाई असतील. ते 2047 चा भारत या विषयावर आपले विचार व्यक्त करणार आहेत.

इंद्रायणी विद्या मंदिर पुरस्काराचे वितरण 

या व्याख्यानमालेत कुस्ती क्षेत्रातील वस्ताद पै.चंद्रकात सातकर(क्रिडा क्षेत्र) पुरस्कार देऊन यांना गौरविण्यात येणार आहेत. याशिवाय सामाजिक क्षेत्र ज्येष्ठ नेते भास्करराव म्हाळसकर,सांस्कृतिक क्षेत्र. डाॅ. अनंत परांजपे आणी उद्योग क्षेत्रातील बांधकाम व्यावसायिक शैलेश शहा आदी मान्यवरांचा सन्मान पुरस्कार देऊन करण्यात येणार असल्याचे संस्था अध्यक्ष रामदास काकडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

एक सहिष्णू आणि पुरोगामी विचारांचे व्यक्तिमत्व म्हणून कृष्णरावजी भेगडे उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. शिक्षण,सहकार,उद्योग,आरोग्य आदी क्षेत्रातील त्यांचे कार्य मावळ तालुकाच नव्हे तर महाराष्ट्राला ज्ञात आहे.त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याच्या उदात्त हेतूने या व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात येते असे. कार्यक्रमाचे निमंत्रक, संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी सांगितले.

त्यानिमित्ताने नामवंत विचारवंतांचे विचारधन ऐकण्याची उत्तम संधी विद्यार्थी, पालकवर्ग, नागरिकांना मिळणार आहे.असे व्याख्यानमालेचे निमंत्रक, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे कार्यवाह चंद्रकांत शेटे,संयोजन समिती अध्यक्ष शैलेश शहा, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एस के मलघे यांनी सांगितले.

विद्यार्थी,पालकवर्ग व नागरीकांनी यंदाच्या वर्षी जागतिक स्तरावर योगदान दिलेल्या नामवंत विचारवंताना ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजकांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.