Pune : तूच का पाटील? म्हणत टोळक्याकडून कार चालकाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – तूच का पाटील? तुला कळले असेल (Pune) आम्ही तुला का मारतोय? असे म्हणत साह ते सात जणाच्या टोळक्यांनी कार चालकाला बेदम मारहाण केली आहे. हा प्रकार सोमवारी (दि.5) रात्री उशीरा ताथवडे येथे घडला.

याप्रकरणी विष्णू यशवंत पाटील (वय 45, रा.आंबेगाव, पुणे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून सहा ते सात अनोळखी इसमा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे त्यांच्या इर्टिगा कारमधून (एम एच 14 टी वाय 6251) जात असताना त्यांच्या मागून दुचाकीवरून येणाऱ्या चालकाने फिर्यादीच्या गाडीला जाणूंनबुजून दोन वेळा डॅश मारली. यावेळी फिर्यादींनी त्यांची कार रस्त्याच्या बाजूला घेतली असता आरोपीही त्यांच्या जवळ (Pune) आले व त्यांनी फिर्यादीला गाडीला धक्का मारतो का म्हणत लाथाबुक्क्यांनी फिर्यादीला मारहाण करण्यास सुरुवात केली.

Pimpri News: प्रधानमंत्री आवाससाठी 15 डिसेंबरला सोडत

त्याचे आणखी तीन ते चार साथीदार तेथे आले. त्यातील एकाने रोडच्या कडेला पडलेला ब्लॉक उचलून तूच का पाटील, तुला का मारतोय तुला समजले असेल म्हणत डोक्याच्या मागे मारून गंभीर जखमी करत आरोपी तेथून पळून गेले. यावरून वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.