Pune : जमिनीच्या वादातून शिवीगाळ करत महिलेचा विनयभंग; अभिजीत शिवरकरसह दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – भूमापन अधिकाऱ्यांनी मोजणी केलेल्या जमिनीवर कंपाउंड (Pune) करत असताना दहा ते पंधरा जणांनी महिलेला शिविगाळ करत विनयभंग केला. वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा संपूर्ण प्रकार घडला. याप्रकरणी अभिजीत चंद्रकांत उर्फ बाळासाहेब शिवरकर यांच्यासह दहा ते पंधरा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अभिजीत चंद्रकांत उर्फ बाळासाहेब शिवरकर, भास्कर रत्नाकर गायकवाड, राजेश खैरलिया, किरण छेत्री आणि त्यांच्यासोबत असलेले 10 अनोळखी लोक त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका 40 वर्षीय महिने या प्रकरणी तक्रार दिली आहे.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, वानवडीत फिर्यादी यांची आणि त्यांच्या भावकींची वडिलोपार्जित मिळत आहे. फिर्यादी महिला या मिळकतीच्या वारस आहेत. या जागेची त्यांनी भूमापन अधिकारी यांच्याकडून सरकारी मोजणी केली आहे. या जागेवर त्या काही महिला आणि पुरुष कामगार यांची कडून कंपाऊंड लावून घेत होत्या.
यावेळी आरोपींनी त्या ठिकाणी येऊन लोखंडी पिलर काढून टाकले आणि कामगारांना काम करू दिले नाही. तसेच फिर्यादीला शिवीगाळ करत साडीचा पदर ओढून  फरपटत बाहेर काढले. पुन्हा या ठिकाणी दिसला तर मुडदे पाडण्याची धमकी दिली. वानवडी पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू (Pune) आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.