Pune News : कर्करोगमुक्त नागरिकांनी अभिनव पद्धतीने केला जागतिक कर्करोग दिन साजरा

एमपीसी न्यूज  – कर्करोगाविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी 4 फेब्रुवारी हा जागतिक कर्करोग दिन जगभरात साजरा केला जातो. (Pune News) पुण्यातील प्रोलाइफ कॅन्सर सेंटर आणि रिसर्च इन्स्टिट्यूटने यावर्षी हा अभिनव पद्धतीने साजरा केला. शंभर हून अधिक कर्करोगमुक्त झालेल्या व्यक्तींसोबत हॉस्पिटलने हा दिवस साजरा केला.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून ब्रेस्ट कॅन्सर सर्व्हायर होते. यावेळी माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले, प्रवीण चोरबेले, वसंत मोरे उपस्थित होते.

अनेक कॅन्सरग्रस्तांनी त्यांच्या प्रवासाबद्दल सांगितले, त्यापैकी अनेकजण हे 5 वर्षांपेक्षा अधिक चांगले आहेत तर काही 10 वर्षांपेक्षा अधिक चांगले आहेत.डॉ. सुमित शहा म्हणाले की आमचा उद्देश हा सर्व कर्करोग रुग्णांना न्याय्य उपचार देणे आणि त्यांच्या जीवनात आशा निर्माण करणे आहे.

Pimpri News : पिंपरी-चिंचवड महिला उद्योजकांच्या प्रश्नासंदर्भात दुर्गा भोर यांनी दिले उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन

स्तनाच्या कर्करोगातून बरे झालेल्या डॉ. रीमा मेनन म्हणाल्या की, आपण सर्वजण कर्करोगावर निश्चितच विजय मिळवू शकतो.स्तनाच्या कर्करोगातून बरे झालेल्या कुसुम कुलकर्णी म्हणाल्या की, कर्करोगाची लक्षणे आढळल्यास वेळ वाया घालवू नका. (Pune News) तोंडाचा कर्करोगाचा सामना करणारे अनंत घुले म्हणाले की, कर्करोगमुक्त जीवनाचा आनंद घेणे म्हणजे पुनर्जन्म आहे. तर 10 वर्षांपासून तोंडाचा कर्करोगाचा सामना करणारे सचिन नलावडे म्हणाले की, आयुष्य खूप सुंदर आहे मला आपल्या शरीराचे ऐकणे आवश्यक आहे.

धन्वंतरी पूजनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. प्रोलाइफ च्या एमडी डॉ. नेहा शाह यांनी प्रास्ताविक केले. कॅन्सर सर्जन डॉ.सुमित शहा यांनी आभार मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.