Pune : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या कारला अपघात

एमपीसी न्यून : पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (Pune) आयुष प्रसाद यांच्या वाहनाचा अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. बुधवारी दुपारी पुणे-नाशिक महामार्गावर हा अपघात झाला.

आंबेगाव तालुक्यातील एकलहरे येथे हा अपघात झाला आहे. घटनेत आयुष प्रसाद यांच्या इनोव्हा कारला ट्रकने धडक दिली. या धडकेत इनोव्हा कारचे दोन्ही टायर फुटले. मात्र फक्त दैव बलवत्तर म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद या अपघातातून वाचले.

Shapit Gandharva : शापित गंधर्व – भाग 44 – दुःखी ‘आनंदी’ प्रत्युषा बॅनर्जी

सुदैवाने त्यांच्यासोबत असलेले अंगरक्षकही या अपघातातून बचावले. पुण्यावरून जुन्नर येथे (Pune) केंद्रीय सचिव दौऱ्यासाठी जात असताना ही घटना घडली आहे. मंचर पोलीस स्टेशनमध्ये याबाबत तक्रार दाखल केली गेली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.