PMC : बांधकाम थांबविण्याचा इशारा देताच एसटीपी वॉटरसाठी 765 बांधकाम व्यावसायिकाची पुणे महापालिकेकडे नोंदणी

एमपीसी न्यूज – पाणी कपात व लांबलेला पाऊस पहाता पुणे (PMC) महापालिकेने बांधकामासाठी मैलापाणी शुद्धीकरण केंद्रातील (एसटीपी) प्रक्रिया केलेले पाणी वापरणे बंधनकारक केले होते. सुरवातीला त्याकडे बांधकाम व्यावसायिकांनी दुर्लक्ष केले होते, पण बांधकाम थांबविण्याचा इशारा दिल्यानंतर महापालिकेच्या ॲपवर 765 बांधकाम व्यावसायिकांनी नोंदणी केली असून, आत्तापर्यंत 4 लाख 90 हजार लिटर पाण्याच वापर बांधकामासाठी केले आहे.

शहरातील 8 मैला शुद्धीकरण केंद्रातून सुमारे 400 ते 450 एमएलडी पाणी शुद्ध करून पुन्हा नदीत सोडले जाते. हे शुद्ध केलेले पाणी बांधकामासाठी वापरता येणे शक्य आहे.

त्यामुळे महापालिकेने वारंवार बांधकाम व्यावसायिकांना त्याबाबत (PMC) आदेश दिले होते. सांडपाण्याचा पुनर्वापर करण्याच्या उद्देशाने पुणे पालिकेने एसटीपी टँकर नावाचे ॲप विकसित केले आहे.

आत्तापर्यंत एकूण 147 टँकर धारक, 765 बांधकाम व्यावसायिकांनी नोंदणी केली आहे. या अॅप मार्फत एकूण 765 बांधकाम व्यवसायिकांना 147 टँकर 8 सांडपाणी प्रकल्पाच्या माध्यमातून 4 लाख 90 हजार लिटर पाण्याचा बांधकामासाठी वापर केला आहे, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

Pune : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या कारला अपघात

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.