Pune Rain : पुढील चार दिवस पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा

एमपीसी न्यूज – पाऊस आता पुन्हा सक्रिय होत असून पुढील (Pune Rain) तीन ते चार दिवस पुण्यासह मध्य महाराष्ट्र व विदर्भातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्य़ात आला आहे. पुण्यातील हवामान संशोधन आणि सेवा विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी काल (बुधवारी) ट्वीट करून यासंदर्भातील माहिती दिली.

पुढील चार ते पास दिवस राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा त्यांनी दिला आहे. त्यामुळे हवामान खात्याचा अंदाज विचारात घेऊन कामाचे नियोजन करा असं त्यांनी म्हटलं आहे. पुणे, सातारा, कोल्हपूर, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, नाशिक, पालघर, ठाणे, वर्धा, यवतमाळ, नागपूर, गोंदिया या भागातही येत्या काळात पाऊस जोर धरणार आहे, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

PMC : बांधकाम थांबविण्याचा इशारा देताच एसटीपी वॉटरसाठी 765 बांधकाम व्यावसायिकाची पुणे महापालिकेकडे नोंदणी

भारतीय हवामान विभागाने महाराष्ट्रासाठी पुढील 4 ते 5 दिवसांसाठी तीव्र हमानाचा इशारा जारी केला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देत या भागात रेड अलर्ट जारी केला आहे.रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या कोकणपट्ट्यात ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कोकणात गेल्या काही दिवसांपासून चांगला पाऊस कोसळत असून यापुढेही हवामान खात्याच अंदाज घेऊन कामाचे नियोजन करण्याचे आवाहन (Pune Rain) करण्यात आले आहे.

एका बाजूला पावसाचा इशारा मिळाला असला तरी दोन मागील दिवसांपासून पावसाने काहिशी उसंत घेतल्याचे चित्र पुणे व आसपासच्या परिसरात पहायला मिळाले आहे. तसेच 1 जून पासून पुण्यात केवळ 115 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.