Pimpri : भामा-आसखेड जलवाहिनीचे काम सहा महिन्यात पूर्ण करणार

अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे यांची माहिती

एमपीसी न्यूज – भामा-आसखेड धरणातून थेट जलवाहिनीद्वारे (Pimpri) पाणी शहरवासियांना मिळणार आहे. या जलवाहिनीला प्रशासकीय स्तरावर गती देण्यात आली असून आत्तापर्यंत 11 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून 4 किलो मीटरची जागा ताब्यात आहे. त्यामुळे उर्वरित 16 किलो मीटरचे काम येत्या सहा महिन्यात पूर्ण करण्याचा पालिकेचा मानस असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांनी दिली.

भामा-आसखेड धरणातून थेट जलवाहिनीव्दारे 167 एमएलडी पाणी आणले जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या वतीने ज्या ठिकाणी जागा ताब्यात मिळाली आहे, त्या ठिकाणी जलवाहिनीचे कामकाज वेगात सुरू करण्यात आले आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जलवाहिनीसाठी पालिकेला तत्काळ जागा उपलब्ध करून देण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांना आदेश दिलेले आहेत. आत्तापर्यंत वरिष्ठ पातळीवर तीन बैठकादेखील झाल्या आहेत.

Pune Rain : पुढील चार दिवस पुण्यासह ‘या’ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; तर कोकणात अतिवृष्टीचा इशारा

याबाबत माहिती देताना अतिरिक्त आयुक्त जांभळे-पाटील म्हणाले, भामा-आसखेड (Pimpri) धरण ते चिखली जलशुध्दीकरण केंद्र असे 31 किलो मीटर अंतर आहे. सध्यस्थितीत जलवाहिनीचे वेगाने आणि आवश्‍यक असेल तेथे पोलीस बंदोबस्तात कामकाज सुरू आहे. आत्तापर्यंत 11 किलोमीटरचे काम पूर्ण झाले असून 4 किलो मीटरची जागा ताब्यात आहे.

त्यामुळे उर्वरित 16 किलो मीटरचे काम येत्या सहा महिन्यात पूर्ण करण्यात येईल. तसेच आंद्रा धरणातून इंद्रायणी नदीत सोडण्यात येणारे 50 एमएलडी पाणी पालिका उचलत होती. आता यामध्ये आणखी 5 एमएलडी पाणी वाढविले आहे. ज्या सोसायट्यांना पाणी कमी पडत अशा सोसायट्यांना पाणी देण्यात येत आहे. तसेच जलवाहिनीसाठी ज्या ठिकाणी जागा ताब्यात नाही, अशा जागेसाठी संबंधित विभागाकडे ना हरकत दाखल्यासाठी अर्ज केलेले असल्याचेही त्यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.