Talegaon-Dabhade : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी विशेष लक्ष द्यावे – बाळासाहेब राक्षे

एमपीसी न्यूज – विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षकांनी विशेष लक्ष देऊन काम केले पाहिजे. असे आवाहन (Talegaon-Dabhade) मावळ तालुका पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी बाळासाहेब राक्षे यांनी येथे केले.  

पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षण विभाग आणि पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघ यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या गुणवत्ता शिष्यवृती मार्गदर्शन कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे म्हणून श्री राक्षे हे बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष राजेश गायकवाड, मावळ तालुका मुख्याध्यापक संघाचे  अध्यक्ष विठ्ठल माळशिकारे, मुख्याध्यापक प्रकाश शिंदे, माजी  मुख्याध्यापक बी.एम.भसे, दौलतराव शितोळे उपस्थित होते.

Aditi collection : आळंदीकरांना कपडे खरेदीचा उत्तम पर्याय म्हणजे आदिती कलेक्शन

या कार्यशाळेला मावळ तालुक्यातील इयत्ता 5 वीआणी 8 वीला शिकवणारे शिक्षक तसेच  NMMS या शिष्यवृती परिक्षेला शिकविणारे शिक्षक  उपस्थित होते.(Talegaon-Dabhade) त्यांना संकेत पोंक्षे, उमेश इंगुळकर,सविता केंगले,श्रीकांत दळवी या तज्ञांनी मार्गदर्शन केले. आदर्श विद्या मंदिर येथे ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. संस्थेचे सचिव यादवेंद्र खळदे यांनी या कार्यशाळेला शुभेच्छा दिल्या.या कार्यशाळेचे सुत्रसंचालन किसन पाटील यांनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.