Rahatani News : रहाटणीत मायलेकीची आत्महत्या

एमपीसी न्यूज – सज्जनगड, रहाटणी येथे मायलेकीने आत्महत्या केली आहे. आज (शनिवारी, दि.18) सकाळी 10 ते 11 वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. पतीच्या त्रासाला कंटाळून हि आत्महत्या केल्याचे वाकड पोलिसांनी सांगितले.

सोनाली युवराज नवले (वय 30) आणि श्रावणी युवराज नवले (वय 12) असे आत्महत्या केलेल्या मायलेकीची नावं आहेत. पतीच्या त्रासाला कंटाळून मायलेकीने आत्महत्या केली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, पोलिसांनी पतीला ताब्यात घेतले आहे. अशी माहिती वाकड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी दिली.

‘अकस्मात मयत म्हणून तक्रार दाखल करण्यात आली असून, व्हिसा राखून ठेवला आहे. मायलेकीचे शव विच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहे. विच्छेदन अहवाल आणि माहेरच्या लोकांचे आरोप विचारात घेऊन गुन्हा दाखल करण्यात येईल,’ असे विवेक मुगळीकर म्हणाले.

दरम्यान, यावेळी मुलीच्या माहेरच्या लोकांना घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. पोलिसांना शव ताब्यात घेण्यासाठी सुरवातीला अडवणूक करण्यात आली. पोलिसांनी त्यानंतर दंगा नियंत्रक पथक बोलवली गर्दी नियंत्रणात आणली व शव ताब्यात घेतली. यावेळी मोठ्या प्रमाणावर बघ्यांची गर्दी याठिकाणी गोळा झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.