Vadgaon Maval : गगनगिरी ज्योतचे वडगावमध्ये स्वागत

एमपीसी न्यूज – पुनावळे येथील नवचैतन्य गगनगिरी मंडळाच्या वतीने दत्तजयंती निमित्त गगनगिरी महाराज ज्योत काढण्यात आली. या ज्योतीचे वडगाव शहरात जय मल्हार ग्रुपच्या वतीने उत्साहात स्वागत करण्यात आले.

शनिवारी (दि. 18) दत्त जयंतीनिमित्त पुनावळे येथील नवचैतन्य गगनगिरी मंडळाच्या वतीने गगनगिरी महाराज ज्योत काढण्यात आली. वडगाव शहरातील खंडोबा चौकात संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक सुभाषराव जाधव यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच पोपटराव वहिले, नगरसेवक राजेंद्र कुडे, निवृत्त तहसीलदार किसनराव वहिले,खादी ग्रामोद्योगचे संचालक सुदेश गिरमे, नवचैतन्य गगनगिरी मंडळाचे अध्यक्ष चेतन भुजबळ, हेमंत कोयते,माजी उपसरपंच विशाल वहिले,ओ.बी.सी सेल चे अध्यक्ष मंगेश खैरे,भैरवनाथ शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष पै सचिन ढोरे, ॲड अजित वहिले, महावीर दुबे, तुषार वहिले, शंकर साकोरे,रोहित गिरमे,सुहास वायकर, शैलेश वहिले,संतोष देशमुख, सतिश राऊत,आदि उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.