Rahatni : शॉर्टसर्किट होऊन व्यावसायिक संकुलातील सर्व्हर रूमला आग

एमपीसी न्यूज – व्यावसायिक संकुलातील सर्व्हर रूमला बॅट-या गरम झाल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागली. ही घटना आज, सोमवारी (दि. 4) सायंकाळी पावणेसहा वाजता रहाटणी येथील शिवार चौकात घडली.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नगरसेवक नाना काटे आणि महेश चव्हाण यांनी अग्निशमन विभागाला माहिती दिली की, रहाटणी येथील शिवार चौकात रेम्बो प्लाझा हे व्यावसायिक संकुल आहे. तिथे आग लागली आहे. त्यानुसार संत तुकारामनगर आणि रहाटणी येथील दोन बंब घटनास्थळी दाखल झाले.

अग्निशमन विभागाच्या जवानांनी तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले. व्यावसायिक संकुलात तिसऱ्या मजल्यावर सर्व्हर रूम आहे. तिथे आलेल्या बॅट-यांचे तापमान जास्त झाल्याने शॉर्टसर्किट होऊन आग लागली. आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवित हानी झाली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.