Railway : पुणे-लोणावळा लोकल, प्रगती, सह्याद्री एक्सप्रेससह विविध प्रश्नांवर चर्चा

एमपीसी न्यूज – विभागीय रेल्वे वापरकर्ते सल्लागार समिती पुणे विभागाची पाचवी बैठक ( Railway) बुधवारी (दि. 20) विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयात पार पडली. पुणे-लोणावळा लोकलच्या फेऱ्या वाढवणे, प्रगती, मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा सुरू करणे, पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेसचा चिंचवड येथे थांबा करण्यासह विविध प्रश्नांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदूराणी दुबे या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलिंद हिरवे या बैठकीचे समन्वयक होते. बैठकीत उपस्थित सदस्यांनी प्रवाशांच्या सुविधा व समस्यांबाबत सूचना देऊन रेल्वे प्रशासनाशी चर्चा केली. विभागीय रेल्वे व्यवस्थापक दुबे यांनी प्रश्नांवर योग्य तोडगा काढण्याचे आश्वासन दिले.

Maval : मावळातील पाणी योजनांच्या कामांची चौकशी होणार

पुणे विभागाचे डीआरयूसीसी सदस्य शिवनाथ बियाणी, गोपाल तिवारी, बशीर सुतार, सुरेश माने, किशोर भोरावत, निखिल काची, तानाजी कराळे, ॲड. आप्पासाहेब शिंदे, अजित चौगुले, दिलीप बटवाल, विजय चव्हाण या बैठकीला उपस्थित ( Railway) होते.

बैठकीला संबोधित करताना विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदूराणी दुबे यांनी पुणे विभागातील विविध विकास कामे, प्रवासी सुविधा, पायाभूत सुविधांची कामे, उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. रेल्वे सुरक्षित आणि वेळेवर धावणे, रेल्वे रुळांची योग्य देखभाल, सिग्नल यंत्रणा मजबूत करणे आदींसाठी योग्य पावले उचलली जात असल्याचे त्या म्हणाल्या. पुणे रेल्वे प्रशासन प्रवाशांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे. रेल्वेच्या विकासासाठी, प्रवासी सुविधांचा विस्तार आणि महसूल वाढीसाठी सदस्यांनी अर्थपूर्ण प्रयत्न करावेत आणि सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

या प्रश्नांवर झाली चर्चा

बैठकीत उपस्थित सदस्यांनी पुणे-कोल्हापूर दरम्यान इंटरसिटी एक्स्प्रेस ( Railway) सुरू करणे, मुंबई-कोल्हापूर सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा सुरू करणे, विशेषत: सकाळच्या वेळेत दैनंदिन प्रवाशांसाठी मिरज ते कोल्हापूर गाड्यांची उपलब्धता, पुणे-मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेसचा चिंचवड येथे थांबा, पुणे-लोणावळा दरम्यान लोकलची संख्या वाढवणे आणि दुपारच्या लोकलची उपलब्धता, पुणे-अहमदाबाद, पुणे-भुज, पुणे-बिकानेर आणि दौंड-इंदूर इत्यादी मार्गांचा मिरज आणि कोल्हापूरपर्यंत विस्तार,

कोल्हापूर वरून कलबुर्गी आणि मिरज ते बेळगावी, पंढरपूर, सातारा नवीन गाड्या सुरू करणे, कोल्हापूर – हजरत निजामुद्दीन रोज धावणे, हजरत निजामुद्दीन – गोवा, कोल्हापूर – अहमदाबाद, कोल्हापूर – मुंबई, दादर – म्हैसूर शरावती एक्स्प्रेस, दादर – पुद्दुचेरी एक्स्प्रेसचा लोणंद येथे थांबा, यशवंतपूर संपर्क क्रांती, हमसफर एक्स्प्रेसचा सातारा येथे थांबा, लोणंद येथे विकासकामे, स्थानक, पुणे स्थानकावर पुरेशा प्रमाणात साइनेज बसवणे, लिफ्ट आणि एस्केलेटरची सुविधा, सीसीटीव्ही, सुरक्षा, पार्किंग समस्येवर तोडगा, प्रवासी सुविधा विकसित करणे, अतिक्रमणमुक्त रेल्वे परिसर आणि हडपसर रेल्वे स्थानकावर कोच इंडिकेटर असे विविध मुद्दे उपस्थित केले.

याबाबत योग्य ती पावले उचलण्याचे आश्वासन विभागीय रेल्वे व्यवस्थापक यांनी दिले. बैठकीस सर्व शाखाधिकारी उपस्थित होते. विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. रामदास भिसे यांनी आभार ( Railway) मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.