Ram Mandir : श्री राम भक्तांसाठी आनंदाची बातमी; ‘या’ तारखेला होणार मंदिराचे उद्घाटन

एमपीसी न्यूज : श्री राम भक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली (Ram Mandir) आहे. अयोध्येतील राम मंदिराचे 22 जानेवारी 2024 रोजी उद्घाटन होणार आहे. दिल्ली येथे राम मंदिर ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटून अधिकृत निमंत्रण दिले आहे. तसेच हे उद्घाटन दुपारी साडेबारा वाजता नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हंटले, की आजचा दिवस भावनांनी भरलेला आहे. नुकतेच श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे अधिकारी मला माझ्या निवासस्थानी भेटायला आले होते. त्यांनी मला श्री राम मंदिराच्या अभिषेक प्रसंगी अयोध्येत येण्याचे निमंत्रण दिले आहे.

Manchar : सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते मंचर येथे सी.टी.स्कॅन तपासणी केंद्राचे उद्घाटन

मला खूप धन्य वाटते. माझ्या आयुष्यात मी या ऐतिहासिक प्रसंगाचा साक्षीदार होणार हे माझे भाग्य आहे. (Ram Mandir)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच श्री राम भक्तांना तसेच संपूर्ण देशासाठी 2024 हे वर्ष फार आनंदाचे तसेच उत्साहाचे ठरणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.