Infosys Foundation : गाणाऱ्या वाद्यांच्या दुनियेत हरवले रसिक जन!; भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार कार्यक्रम  

एमपीसी न्यूज –  भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत  ‘ गाणारी वाद्ये ‘  या कार्यक्रमाला नुकताच सायंकाळी रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. ‘ सिनर्स पुणे ‘ आयोजित विविध वाद्यवादनाच्या या  संगीतमय मैफलीत लावणी, भावगीत, हिंदी गाण्यांचे सादरीकरण (Infosys Foundation) आयोजित करण्यात आले होते.

 

उपेंद्र लक्ष्मेश्वर यांचे संगीत संयोजन असलेल्या या कार्यक्रमात 12 कलाकार सहभागी झाले होते. ग साजणेबुगडी माझीबेकरार करके हमें , सूर तेच छेडीतासावरे सलोने, अखेरचा हा तुलाऐ दिल मुझे बतादेकुन्या गावाच आलं , लग जा गले, केव्हा तरी पहाटेदिल तडप तडप केयाद न जाएही चाल तुरु तुरू , मुंगळातुम्हावर केली मी मर्जी बहाल’ अशा  बहारदार गाण्यांच्या वाद्यवादनाची संगीत मैफल सजली. जयंत जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

 

 

हा कार्यक्रम भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे  झाला.
 भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या (Infosys Foundation) सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा  126 वा कार्यक्रम होता. मेलडी मेकर्सचे इकबाल दरबार, गायक शशांक दिवेकर या कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी प्रास्ताविक  केले. सहभागी सर्व कलाकारांचा प्रशस्तीपत्रक आणि ज्ञानेश्वरी देऊन सत्कार करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.