Ravet News : रावेत मध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरू

एमपीसी न्यूज – सामाजिक कार्यकर्ते दीपक मधुकर भोंडवे यांच्या पुढाकारातून रावेत येथील समीर लॉन्सजवळ ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र सुरु करण्यात आले आहे.  नुकतेच  ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते या विरंगुळा केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी दीपक भोंडवे, धनंजय सोळुंखे, धनंजय शुक्ला, त्र्यंबक थोटे, दिलीप यादव, नरेंद्र पाटील, रंगराव महीम, प्रल्हाद काळे, किरण देसाई, पंढरीनाथ उभारे, तपन सेन गुप्ता, जीवन गीते, अशोक करमारे, महादेव कमलाकर, गोपीनाथ माळी, विनय मोहरे, अनिरुद्ध रवत्राडे, रमेश येरुणकर आदी उपस्थित होते.

जीटी, सिल्व्हर हौसिंग, रुनाल, ट्रॉफीका आणि अडोरा या ग्रुप सोसायट्यांमधील ज्येष्ठ नागरिकांसाठी हे विरंगुळा केंद्र सुरु करण्यात आले आहे. या विरंगुळा केंद्रात कॅरम, बुद्धिबळ, वाचनालय आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

कोरोना महामारी आणि लॉकडाऊनमुळे ज्येष्ठांना घराबाहेर पडणे धोक्याचे झाले होते.  तसेच, धार्मिक स्थळं देखील बंद आहेत.  त्यामुळे ज्येष्ठांचा मानसिक कोंडमारा होत होता.  आता बहुतांश ज्येष्ठांचे लसीकरण झाले आहे.  त्यामुळे त्यांच्या घराजवळ विरंगुळा केंद्र सुरु करण्याचा  निर्णय घेतला, “ असे दीपक भोंडवे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.