Ravet News : रावेतमधील 60 सोसायट्यांमध्ये सॅनिटायझर फवारणी

सामाजिक कार्यकर्ते दीपक भोंडवे यांचा पुढाकार; सोसायटीधारकांमध्ये समाधान

एमपीसीन्यूज : सामाजिक कार्यकर्ते दीपक मधुकर भोंडवे यांच्यावतीने नागरिकांच्या मागणीनुसार रावेत येथील सुमारे 60  गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये स्व:खर्चाने विविध सोसायट्यांमध्ये सॅनिटायझर फवारणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

सध्या पिंपरी चिंचवड शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. नागरिकांना मास्क व सॅनिटायझरचा वापर, सोशल डिस्टंसिंग बंधनकारक करण्यात आले आहे. एकूणच शहरात कोरोनाची भीती निर्माण झाली आहे.

या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी जपत दीपक भोंडवे यांच्या वतीने रावेत परिसरातील विविध गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये सॅनिटायझर फवारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार सोसायटी परिसर, अंतर्गत रस्ते, सोसायटीच्या संरक्षक भिंती, पार्किंग आदी परिसरात सॅनिटायझर फवारणी करण्यात येत आहे. या उपक्रमामुळे स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

रावेत परिसरातील भोंडवे कॉर्नर, समीर लॉन्स, बीआरटी रोड, चंद्रभागा कॉर्नर, शिंदे वस्ती या भागात सॅनिटायझर फवारणी करण्यात आली. या वेळी संबंधित सोसायट्यांमधील सोमनाथ भोंडवे, संपत शिंदे, सुधाकर पाटील, प्राजक्ता रुद्रवार, गिरीश कोकलवार, गिरीश गांगुर्डे, संजय आंबनाळे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.