Ravet : नदीत पोहताना वृद्धाचा बुडून मृत्यू

एमपीसी न्यूज – नदीमध्ये पोहण्यासाठी उतरलेल्या एका वृद्धाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज (बुधवारी) सकाळी आठच्या सुमारास रावेत बंधारा येथे घडली.

नदीत बुडालेल्या इसमाची ओळख अद्याप पटली नसून त्याचे वय अंदाजे 55 वर्ष आहे.

आज सकाळी आठच्या सुमारास मृत्यू झालेला वृद्ध रावेत येथे पवना नदीमध्ये पोहण्यासाठी गेला. कपडे काढून नदीपात्रामध्ये उतरले असता अचानक तो बुडाला. नदीच्या प्रवाहात वाहून धरणाच्या बंधाऱ्यात अडकला. स्थानिक नागरिक बंधाऱ्यावर गेले असता एकजण बुडाला असल्याचे दिसले. याबाबतची माहिती नियंत्रण कक्षाला दिली, त्यावरून रहाटणी अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. फायरमन संतोष सरोटे, मिलिंद पाटील, भूषण येवले, वाहन चालक राजाराम लांडगे यांच्या पथकाने मृतदेह बाहेर काढला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.