Ravet News : तरुणाचा डोक्यात सिमेंटचा ब्लॉक मारून खून

एमपीसी न्यूज : रावेत मध्ये एका तरुणाच्या डोक्यात (Ravet News) सिमेंटचा ब्लॉक मारून त्याचा खून करण्यात आला आहे.या प्रकरणी अज्ञात इसमाविरोधात रावेत पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत विकास जाधव, वय 36 वर्षे, (रा. रावेत गावठाण) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली असून अज्ञात इसमाविरोधात भादवि कलम 302 अन्वये रावेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Pune News : केबल वायरमध्ये अडकलेल्या बिबट्याची सुखरूप सुटका

राजेश, वय अंदाजे 35 ते 40 वर्षे ( पूर्ण नाव पत्ता माहित नाही ) याचा कोणीतरी अज्ञात व्यक्तीने डोक्यात सिमेंटचा ब्लॉक घालून त्याला गंभीर जखमी करत खून केला आहे. (Ravet News) ही घटना 3 जानेवारी 2023 रोजी रात्री 9 वा ते 4 जानेवारी 2023 रोजी सकाळी 9.45 वा च्या दरम्यान घडली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.