Ravi Paranjape : प्रसिध्द चित्रकार रवी परांजपे यांचे निधन

एमपीसी न्यूज – सुप्रसिध्द चित्रकार रवी परांजपे (Ravi Paranjape passed away) यांचे पुण्यात शनिवारी निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. रवी परांजपे यांनी भारतीय चित्रकला शैलीतील चित्रकार म्हणून ओळख होती. त्यांनी वास्तुशिल्पशास्त्र, प्रकाशन, जाहिरात या क्षेत्रातही चांगले काम केले होते.

जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमध्ये रवी परांजपे यांनी संशोधनपर लेखन केले होते.त्यांचे ‘ब्रश मायलेज’ हे आत्मकथन तसेच परदेशी चित्रकारांचा परिचय करुन देणारे शिखरे रंगरेषांची आणि नीलधवल ध्वजाखाली हा लेखसंग्रह प्रकाशित झाला आहे.

Santosh Khandge : मावळचा अष्टपैलू हिरा

रवी परांजपे (Ravi Paranjape passed away) यांचा जन्म 8 ऑक्टोबर 1935 रोजी बेळगाव येथे झाला. रवी परांजपे यांच्या घरातच कलेचा वारसा होता. लहानपणी ते अभ्यासापेक्षा रंगांमध्येच जास्त रमायचे.वयाच्या पाचव्या वर्षी त्यांच्या वडिलांनी हातात कुंचला दिला.त्यामुळे रवी परांजपे यांना मोठा चित्रकारांची चित्र पाहण्याची आवड निर्माण झाली.

त्यानंतर फोटोवरुन ते स्मरण चित्र काढायला लागले. त्यांच्या करीयरची सुरुवात टाइम्स ऑफ इंडियामधील नोकरीने झाली. तेथे ते जाहिरातींसाठी इल्युजन करायचे. नंतर रवी परांजपे यांनी प्रकाशन, जाहिरात, वास्तुशिल्पशास्त्र या क्षेत्रांत भारतामध्ये काम केले. त्यांनी नैरोबी, केनिया येथेही काम केले.

परांजपे यांनी अनेक जागतिक कीर्तीच्या नियतकालिकांमधून संशोधनपर लेखन केले होते. रवी परांजपे यांची एक अनोखी शैली आहे. सशक्त रेषा, सोपी आणि ओघवती मांडणी, त्रिमिती दाखवण्याचे वेगळे कसब,वेगवेगळे पोत कुंचल्यातून साकारण्याची ताकद त्यांच्या चित्रात दिसते.

रवी परांजपे (Ravi Paranjape passed away)  हे 1990 मध्ये पुण्यात स्थायिक झाले. पुण्यात त्यांनी मोठा स्टुडिओ उभारला. 1995 मध्ये त्यांना कम्युनिकेशन आर्टस् गिल्डतर्फे कॅग हॉल ऑफ फेम हा पुरस्कार देण्यात आला. 1996 मध्ये त्यांना दयावती मोदी फौंडेशन आर्ट कल्चर आणि एज्युकेशनतर्फे दयावती मोदी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. प्रसिध्द अभिनेते अमिताभ बच्चन,पं जसराज यांसारख्या मान्यवरांकडे त्यांची चित्र असून संपूर्ण जगात त्यांचे चाहते आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.