Chikhali News : सलग 65 मिनिटे तलवारबाजी करत 38 जणांचा विक्रम; इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद

एमपीसी न्यूज – मर्दानी खेळ असोसिएशन महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने शनिवारी (दि. 16) बड्स इंटरनॅशनल स्कूल, नेवाळे वस्ती, चिखली येथे शिवकालीन मर्दानी खेळांमधे विविध वयोगटातील तसेच पिंपरी चिंचवड, पुणे, कोल्हापूर या ठिकाणाहून आलेल्या 38 खेळाडूंनी न थांबता सलग 65 मिनिटे तलवारबाजी करुन ऐतिहासिक कामगिरी करत राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला. याची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली आहे.

लहान मुलांनी देखील मोठ्यांच्या बरोबर तितक्याच वेगाने आणि ताकदीने तलवार फिरवली. या कार्यक्रमाचे उद्घाटन बड्स इंटरनॅशनल स्कूलचे अध्यक्ष अभय कोटकर यांच्या हस्ते झाले. विक्रमवीर खेळाडूंचे कौतुक सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांनी केले. परीक्षक म्हणून आशिष आगरवाल हे उपस्थित होते.

यावेळी बड्स इंटरनॅशनल स्कूलच्या संचालिका शिल्पा कोटकर, मुख्यध्यापिका सुवर्णा खोत, राष्ट्रीय सैनिक संस्था अध्यक्ष प्रतापराव भोसले, प्रांत पोलीस संघ राष्ट्रीय अध्यक्ष गोपाल बिरारी, सुदेश गायकवाड, डॉ. अमृता नवले, डॉ. मुदस्सीर शेख, स्मिता माने, शुभांगी सरोते, श्रुती गावडे, वेदिका सरोते, निखिल अग्निहोत्री, सुधीर माने, किशोरी अग्निहोत्री, किरण लवटे, शिवाजी बांदल हे उपस्थित होते.

राष्ट्रीय विक्रमवीर खेळाडूंची नावे पुढीलप्रमाणे –

संजय बनसोडे, किरण अडागळे, अभय नवले, अजय नवले, केतन नवले, स्मिता धिवार, रविराज चखाले, सुदर्शन सुर्यवंशी, अंजली बर्वे, श्रेया दंडे, रुपाली चखाले, श्रीशांत पाटिल, शिवम बाबर, भार्गव देढे, अर्सीता सिंग, तनिष्का वाघमारे, अदिती पवार, निक्षीता पाटील, अमृता पाटोळे, वैष्णवी खैरे, साक्षी सैनी, प्रिया सैनी, श्रेयश चव्हाण, मच्छिंद्र पाटील, धनाजी जाधव, सार्थक लोले, नयन शिंपनेकर, कस्तुरी पोतदार, स्वरुप नाळे, ईशा दास, सागर खराडे, गणेश गेजगे, सुमित तांबवेकर, मोहित पाटील, स्वराज अडागळे, अपूर्वा चव्हाण, ऋतुजा पाटील, लकी शिंद

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.