Vadgaon Maval : मावळ तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीचे निकाल सोमवारी १२ वाजे पर्यंत होणार जाहीर

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीच्या 316 जागांसाठी शुक्रवारी (दि 15) रोजी झालेल्या मतदानाची मतमोजणी उद्या सोमवार (दि 18) रोजी तळेगाव दाभाडे येथे सकाळी दहा वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरूवात होणार असून सर्व निकाल दुपारी बारा वाजेपर्यंत जाहीर होतील. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली.

शुक्रवारी (दि 15) रोजी तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीसाठी 150 मतदान केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. मतदारांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत मतदानाचा हक्क बजावला. एकूण 82 हजार 519 पैकी 67 हजार 402 म्हणजे 81.68 टक्के मतदारांनी मतदान केले. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान केंद्रावरील मतदान मशीन तळेगाव दाभाडे येथील पै विश्वनाथराव भेगडे क्रीडा संकुलामध्ये जमा करण्यात आल्या.

उद्या सोमवार (दि 18) रोजी सकाळी 10 वाजता मतमोजणी प्रक्रियेला सुरूवात होणार असून 32 टेबल व 100 कर्मचा-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व 32 टेबलवर एकाच वेळी मतमोजणी सुरू होणार असून चार ते पाच फे-यांमध्ये संपूर्ण मतमोजणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यामुळे दुपारी बारा वाजेपर्यंत सर्व निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे.

यापूर्वीच्या सर्व निवडणुकांची मतमोजणी तालुका मुख्यालय असलेल्या वडगाव मावळ येथे झालेल्या आहेत. आज पर्यंतच्या इतिहासात ग्रामपंचायत निवडणूकीची मतमोजणी वडगाव मावळ येथे होत होती. मात्र यावेळी जागेच्या अडचणीमुळे ग्रामपंचायतीची मतमोजणी प्रथमच तळेगाव दाभाडे येथे होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.