Chikhalwadi Problems : चिखलवाडीतील समस्यांसंदर्भात सहाय्यक आयुक्तांकडून आढावा

एमपीसी न्यूज – चिखलवाडी (Chikhalwadi Problems) येथील लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या समस्या सोडवण्यासाठी प्रशासनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. याबाबत भाजप पुणे शहर चिटणीस सुनील माने यांनी पुढाकार घेत, औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त संदीप खलाटे यांच्या सोबत प्रत्यक्ष पाहणी करून येथील समस्यांसंदर्भात त्यांना अवगत केले.

यावेळी स्वप्नील कांबळे, अक्षय जगताप, अमन भालेराव, सुरज गायकवाड, मयूर गायकवाड, सारंग खरात, जितेंद्र गायकवाड, भिमराव वाघमारे, अनिल माने, प्रतीक वाघमारे आदी उपस्थित होते.

याबाबत अधिक माहिती देताना सुनील माने म्हणाले, चिखलवाडीवासियांना (Chikhalwadi Problems) पिण्याच्या पाण्याचा पुरवठा नेहमीच कमी दाबाने व अवेळी केला जातो. येथे असणाऱ्या  सार्वजनिक शौचालये नियमित साफ केली जात नसल्याने, दोन्ही बाजूंची शौचालये तुंबली असून येथे घाण साठून राहते. परिसरातील कचरा व राडारोडा नियमित उचलला जात नसल्याने परिसरात कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. वस्तीतील पथदिवे बंद स्थितीत आहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.

येथील सुदर्शन चौकात असलेल्या पिंपळाच्या झाडाला कीड लागली असून हे झाड धोकादायक बनले आहे. या झाडावरील किड्यांमुळे लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. येथील हॉकी स्टेडीयम जवळ पिण्याच्या पाण्याची तसेच ड्रेनेजजी पाईपलाईन फुटून त्यातील पाणी रत्यावर वाहत आहे. हॉकी स्टेडीयम मधील गवतही मोठ्या प्रमाणावर वाढल्याने या स्टेडियमचा वापर खेळण्यासाठी होत नाही. या सारख्या समस्यांबाबत स्थानिकांकडून माझ्या जनसंपर्क कार्यालयात वारंवार तक्रारी येत होत्या.

लोकांना या समस्यांमधून दिलासा देण्यासाठी मी औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाचे सह. आयुक्त संदीप खलाटे यांच्याशी चर्चा करून, या  समस्यांबाबत आपण गांभीर्याने लक्ष घालून योग्य त्या उपाय योजना कराव्यात अशी विनंती केली होती. यानुसार गुरुवारी त्यांच्यासोबत मी संयुक्त पाहणी केली. या संयुक्त पाहणी दौऱ्यात येथील नागरिकांनी त्यांच्यासमोर तक्रारी मांडल्या. यावर त्यांनी या समस्यांबाबत लवकरात लवकर तोडगा काढण्याचे अश्वासन दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.