PMC workers : सफाई कर्मचाऱ्यांसाठी दिपावली मिलनाचे आयोजन

एमपीसी न्यूज – पुणे महानगरपालिका प्रभाग क्र 11 औंध श्रेत्रिय कार्यालयातील सफाई कर्मचार्‍यांसाठी पुणे शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा पूजा मनिष आनंद (PMC workers) तसेच पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष व खडकी छावणी परिषदेचे मा. सदस्य मनिष सुरेंद्र आनंद यांच्या वतीने नागरिकांसाठी सदैव तत्पर व परिसराच्या स्वच्छतेसाठी कर्तव्य बजावणार्‍या कर्मचार्‍यांसाठीदिपावली मिलनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमात चांदीचे नाणे, सफाई करताना आवश्यक असणारे सुरक्षा साहित्य व पुष्पगुच्छ देऊन आरोग्य अधिक्षक, मुकादम व 550 हुन अधिक कर्मचार्‍यांचा सन्मान पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

यावेळी माजी आमदार दिप्तीताई चवधरी, मा.नगरसेविका शैलेजाताई खेडेकर, मा.नगरसेविका सौ.रेखा गेहलोत, बोपोडी ब्लॉक काँग्रेस अध्यक्ष राजेंद्र भुतडा, मा.नगरसेवक अँड. नंदलाल धिवार, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस सचिव सौ. स्वातीताई शिंदे, सोनावणे, महाराष्ट्र प्रदेश ओबिसी सेल सरचिटणिस ज्योतीताई परदेशी, ओबिसी सेल महिला पुणे शहर अध्यक्षा सौ. सुंदरताई ओव्हाळ, अँड. रमेश पवळे सर,(PMC workers) विनोद रणपिसे, इंद्रजित भालेराव, मैन्नुद्दिन अत्तार, अँड. विठ्ठल आरुडे, साजिद शेख, ईंदुबाई गायकवाड, प्राजक्ता गायकवाड, रमाताई भोसले, अख्तरी शेख, पपिता सोनावणे, प्रदिप खेडेकर, मयुरेश गायकवाड, झुबेर पिरजादे, निकाळजे सर, रवि नायर आदी मान्यवरांच्या हस्ते कर्मचार्‍यांचा सन्मान करण्यात आला.

Pimpri news: जिवे मारण्याची धमकी देऊन एका महिलेशी वेळोवेळी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले

कार्यक्रम यशस्वी करण्यास मनिष आनंद मित्र परिवाने विशेष परिश्रम घेतले सूत्रसंचालन बंडु चव्हाण यांनी केले सदर कार्यकमाला सफाई कर्मचार्‍यांचा उत्सफूर्त प्रतिसाद मिळाला तसेच सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.