Pimple Gurav : पिंपळे गुरवमधून रिक्षा चोरीला

एमपीसी न्यूज – पिंपळे गुरव येथे रस्त्याच्या बाजूला (Pimple Gurav) पार्क केलेली रिक्षा अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना 15 जुलै रोजी रात्री दहा वाजता काशीदनगर येथे घडली.

गोपाळ रामराव उखळे (वय 39, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची 30 हजार रुपये किंमतीची रिक्षा (एमएच 12/एचसी 2285) काशीदनगर पिंपळे गुरव येथे रस्त्याच्या बाजूला पार्क केली.

PCMC : रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवा; महापालिका आयुक्तांचे आदेश

रात्रीच्या वेळी एक महिला आणि एक पुरुष अशा दोन अनोळखी चोरट्यांनी (Pimple Gurav) रिक्षाचे लॉक तोडून रिक्षा चोरून नेली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.