Road Romeo arrested : तरुणीची छेड काढणारे रोड रोमिओ अटकेत

एमपीसी न्यूज : दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणीचा पाठलाग करून तिच्याशी अश्लिल वर्तन करणाऱ्या रोड रोमिओंना भोसरी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.(Road Romeo arrested) हा प्रकार मंगळवारी (दि.4) दुपारी फुगेवाडी ते नाशिक फाटा या पुणे-मुंबई महामार्गावर घडला.

पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून महेश अनिल वाघमारे (वय 20 रा. लांडेवाडी) व सागर मारुती हिवरे (वय 21 रा. दिघी रोड) अशी अटक आरोपींची नावे आहेत.

Alandi news : दसऱ्या निमित्त माऊलींच्या समाधी दर्शनासाठी भाविकांची गर्दी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या त्यांच्या मित्रासोबत दुचाकीवरून बसून जात होत्या.यावेळी आरोपी गाडी क्रमांक नसलेल्या वेस्पा गाडीवरून आले व त्यांनी फिर्यादीचा पाठलाग केला. त्यांनतर त्यांनी गाडी जवळ आणत फिर्यादीच्या मित्राला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.(Road Romeo arrested) तसेच फिर्यादीच्या पाठीवरून हात फिरवत अश्लिलवर्तन केले. फिर्यादीच्या मित्राने गाडी थांबवून जाबविचारला असता आरोपींनी मित्राला मारहाण करत त्याच्या खिशातील दोनशे रुपये जबरदस्तीकाढून घेतले. यावरून भोसरी पोलिसांनी तपास करत आरोपींना बेड्या ठोकल्या असून पोलीस पुढिल तपास करत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.