Vadgaon-Maval : पोल्ट्री शेड वरील घरपट्टी माफ करा

एमपीसी न्यूज : मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेची विशेष सभा वडगाव मावळ येथे पार पडली. मावळ तालुक्यात अनेक शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून पोल्ट्री चालवितात.(Vadgaon-Maval) शेतकऱ्यांच्या पोल्ट्री शेडवर ग्रामपंचायतीकडून घरपट्टी (पोल्ट्री टॅक्स) आकारण्यात येतो. ही घरपट्टी ग्रामपंचायतींनी माफ करावी, अशी एक मुखाने मागणी या सभेत करण्यात आली.

वडगाव मावळ येथे संघटनेची विशेष सभा  पोल्ट्री उद्योजक एकनाथ गाडे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.सभेस प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा  परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबुराव अप्पा वायकर, संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष केदारी, उपाध्यक्ष उत्तम शिंदे, संतोष घारे,सोमनाथ राक्षे,सचिव प्रविण शिंदे, सहसचिव महेश कुडले,खजिनदार  विनायक बंधाले,सचिन आवटे,संभाजी केदारी,संभाजी शिंदे आदी उपस्थित होते.

मावळ तालुक्यात शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणुन पोल्ट्री व्यवसाय करीत आहेत.त्यांनी उभारलेल्या पोल्ट्री शेडवर ग्रामपंचायतीकडून अवास्तव घरपट्टी (पोल्ट्री टॅक्स) आकारण्यात येत आहे.(Vadgaon-Maval) काही ग्रामपंचायतीकडून तर गावातील बंगल्यापेक्षा जास्त आकारणी  होत आहे. वास्तविक पाहता पोल्ट्री हा व्यवसाय  शेती व्यवसाय म्हणून आहे.शेती व्यवसायावर कोणताही कर नाही .मात्र शेतीपुरक पोल्ट्री व्यवसायाला ग्रामपंचायतीकडून पोल्ट्रीशेडवर टॅक्स  आकारणी होत. ही कर आकारणी  अन्याय कारक आहे. ही कर आकारणी अन्याय कारक असल्याने त्वरित रद्द करण्यात यावी अशी एकमुखी मागणी या सभेत करण्यात आली. हा ठराव  संघटक सोनबा गोपाळे गुरूजी यानी सभेत सादर केला. त्यास सभेतील  सर्वांनी एकमुखी  पाठींवा  दिला.

Road Romeo arrested : तरुणीची छेड काढणारे रोड रोमिओ अटकेत

आपल्या या मागणीसाठी आपण मावळ पंचायत समिती आणि पुणे जिल्हा परिषदेकडे विशेष प्रयत्न करू अशी ग्वाही  माजी कृषी सभापती बाबुराव अप्पा वायकर यांनी  दिली.(Vadgaon-Maval) यावेळी मावळ तालुक्यातील उत्कृष्ट कामगिरी करणारे सचिन आवटे,सुरेश खरमारे,दगडु गायकवाड, राहुल पारखी, रामदास गोणते पाटील  यांचा आदर्श पोल्ट्री उद्योजक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

या सभेत संघटनेच्या भक्कम बांधणीसाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन अध्यक्ष एकनाथ गाडे यांनी केले आहे. कार्याध्यक्ष सुभाष केदारी यांनी आभार मानले.(Vadgaon-Maval) तर संघटक सोनबा गोपाळे गुरूजी यानी आभार मानले. सभेस पोल्ट्री उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.