Pimpri : बो-हाडेवाडीतील रस्ते, आरक्षणे विकसित होणार; नगरसेविका सारिका बो-हाडे यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज – मौजे बो-हाडेवाडी येथील मंजूर विकास योजनेतील रस्ते आणि आरक्षणे विकसित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बो-हाडेवाडी येथील विविध रस्त्यांचे भुसंपादन आणि आरक्षणे विकसित करण्याच्या प्रस्तावाला स्थायी समितीने नुकतीच मान्यता दिली आहे. यासंदर्भात स्थानिक नगरसेविका सारिका बो-हाडे, वसंत बो-हाटे यांनी पाठपुरावा केला होता. याकामासाठी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी मोठे मार्गदर्शन केले. 

याबाबत माहिती देताना नगरसेविका सारिका बो-हाडे म्हणाल्या, बो-हाडेवाडीचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने रस्ते आणि आरक्षण विकसित करणे गरजेचे आहे. त्यासाठी गेले वर्षभर प्रयत्न केले. विशेषता मंजूर विकास योजनेतील रस्ते आणि आरक्षणे विकसित करण्यावर भर दिला. त्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही पुर्ण व्हावी, याकामी प्रयत्न केले. शहर सुधारणा समिती, महासभेतही त्यास मान्यता घेतली. स्थायी समितीने भुसंपादनास येणा-या खर्चास मान्यता दिली आहे. त्यामुळे सर्व्हेक्षण करणे, मोजणी करणे आदी कामास चालणा मिळणार आहे. 

रस्ते कामांमुळे बो-हाडेवाडीचा चे-हरा-मोहरा बदलणार आहे. उद्यान, प्राथमिक शाळा विकसित झाल्याने या परिसरातील नागरिकांना मुलभूत सुविधा मिळणार आहेत, असेही त्या म्हणाल्या. भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी समाविष्ट गावांचा कायापालाट करण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार समाविष्ट गावात विकास कामे सुरु आहेत. ताब्यात घेण्याची  प्रशासकीय कार्यवाही पुर्ण व्हावी, याकामी त्यांचे मोठे सहकार्य लाभले, असेही बो-हाडे म्हणाल्या. 

ही आहेत रस्ते, उद्याने, शाळेची आरक्षणे! 

बो-हाडेवाडी हद्दीतील गट नंबर 1333 ते 1390 पर्यंत पुणे-नाशिक 60 मी रस्त्यापर्यंतचा मंजूर विकास योजनेतील 18 मीटर रस्ता, मंजूर विकास योजनेतील गट नंबर 1070, 1022, 1062, 1077, 1076, 1078, 1079, 1080, 1059, 1033, 1035, 1070, 1071, 1072, 1073, 1074, 1075 येथील 7.5 मी रस्ता व 12 मी रस्ता, बो-हाडेवाडी येथील संत सावता माळीनगर येथील गट नंबर 1062, 1023, 1026, 1025 मधील 12 मी रस्ता, गट नंबर 1218 पासून ते 1251 पर्यंत मंजूर विकास योजनेतील 18 मीटर रस्ता, गट नंबर  1388, 1389, 1375 मधील मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक 1/154 प्राथमिक शाळा, गट नंबर 1274, 1273, 1270, 1269, 1268, 1272 मधील विकास योजनेतील आरक्षण क्रमांक 1/ 155 उद्यान, गट नंबर 775, 774, 773, 776 मधील मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक 1/182 प्राथमिक शाळा, गट नंबर 1387 मधील मंजूर विकास योजनेतील आरक्षण क्रमांक 1/167 प्राथमिक शाळेचे भूसंपादन करण्यात येणार आहे. 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.