Pune : दुकानाचे शटर उचकटून रोख रकमेसह 58 हजारांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – जंगली महाराज रोडवरील एका बॅग्जच्या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी रोख रकमेसह जवळपास 58 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी शत्रुघ्न चौधरी (वय 23, रा. जंगली महाराज रोड), यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोन अज्ञात इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चौधरी यांचे लक्ष्मी रोडवर रँगलर स्टोअर्स आहे. तसेच त्या शेजारी व्हीआयपी बॅग्जचे दुकान आहे. चोरट्यांनी हे दोन्ही दुकान कूलूप बंद असाताना चोरट्यांनी शटर उचकटून रँगलर स्टोअर्समधील रोख 26 हजार 500 रुपये एक टी शर्ट तीन वॉलेट पाकीट असा 32 हजार रुपयांचा आणि एकूण 58 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरी करून नेला आहे.

याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून डेक्कन पोलीस पुढील तपास करीत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.